सावर्डे : माजी उपमुख्यमंत्री स्व अजितदादा पवार यांच्या जयंती आणि जनसेवा सप्ताह निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र फुरस येथे वालावलकर रुग्णालय डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री सचिवालय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी आणि जन आरोग्य समिती फुरूस यांच्या माध्यमातून फुरूस येथे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी उद्घाटक आ शेखर निकम बोलत होते यावेळी सभापती श्री सूर्यकांत खेतले जन आरोग्य समिती अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य श्री संजय कदम,माजी सभापती श्री पांडुरंग माळी,पंचायत समिती सदस्य मनस्वी बैकर,तालुका आरोग्य अधिकारी सौ ज्योती यादव,वैद्यकीय अधिकारी सानिया सैयद ,आदी मान्यवर उपस्थित होते
या वेळी आ शेखर निकम म्हणाले की आरोग्याच्या सेवा घराघरापर्यंत पोहचवण्याचे काम आरोग्य कर्मचारी अधिकारी यांच्या मार्फत सुरू असले तरी आरोग्याच्या योजना या सुद्धां पोहचल्या पाहिजे ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा मिळाली पाहिजे या साठी जे लागेल ते सहकार्य करताना येथील आरोग्य केंद्राची इमारत सुस्थितीत करण्याबरोबर कर्मचारी आणि अधिकारी यांची रिक्त पदे भरण्याचा प्रयत्न केला जाईल आज शिबिराचे उत्तम आयोजन करण्यात आले असून याचे श्रेय जन आरोग्य समिती कर्मचारी अधिकारी यांचे असून अशाच पद्धतीची शिबिर आयोजित करावीत त्या साठी जे लागेल ते सहकार्य केले जाईल असे आ शेखर निकम यांनी स्पष्ट केले
सदरच्या महाआरोग्य शिबिरात वालावलकर रुग्णालयाचे तज्ञ डॉक्टर,स्त्री रोग तज्ञ ,त्वचा रोग,अस्थी ,जनरल मॅडिसन,फिजिओथेरपीडॉक्टर यांनी रुग्णाची तपासणी केली यावेळी गरोदर माता,प्रिपाप टेस्ट,ब्लड बाय केमिस्ट्री टेस्ट,ब्लड शुगर ब्लड प्रेशर नेत्र तपासणी आदी आजारांची तपासणी करण्यात आली या महाआरोग्य शिबिरात सुमारे अडीचशे रुग्णांची तपासणी करण्यात आली
या शिबिरासाठी जन आरोग्य समिती सदस्य सौ डॉ वर्षा खानविलकर,सतीश घाग,जगदीश कांबळे,श्री सुधीर राजेशिर्के फुरूस सरपंच श्री शांताराम कदम , तळवडे सरपंच सौ दुर्वा विचारे, हडकणी सरपंच नितीन सावंत,असुर्डे सरपंच पंकज साळवी, माजी सरपंच प्रकाश कदम,सचिन चव्हाण,विष्णु वाडेकर,उपसरपंच सचिन खर्डे दत्ता गुजर,रवींद्र साळुंखे सामाजिक कार्यकर्ते विष्णू सकपाळ,बंड्या कदम, संजय कदम ,दीपक शिर्के,अरुण आदटराव प्रकाश गुरव,प्रकाशराव कदम,अशोक चव्हाण,रणवीर मोरे,निलेश खापरे समोर चौगुले सुधीर सावर्डेकर रवींद्र धूमक इंजीनिअर साहिल भंडारी आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते