खेड : – शहराजवळील भरणे जाधववाडी येथे दुचाकी ( क्र.एम.एच.०८ एक्स् ६२९५ ) ला पाठीमागून भरधाव वेगात धावणा-या डंपर (क्र.एम.एच.११ डी.व्ही. ७४७४) ने धडक दिल्याने दुचाकीस्वार अक्षय संतोष जाधव (२५, रा. भरणे,ता. खेड, जि. रत्नागिरी) हा दुकानदार गंभीर जखमी झाला असून,त्याला जगद्गुरु रामनंदाचार्य श्रीनरेंद्राचार्य संस्थान नाणिज धामच्या रुग्णवाहीकेने कळंबणी येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात शुक्रवार दि. १० एप्रिल रोजी सकाळी ९ : ४५ वाजताच्या सुमारास घडला. अधिक तपास येथील पोलीस करीत आहेत.
About The Author
Related Posts
Recent Posts
- न्यू इंग्लिश स्कूल तुंबाड येथे वॉटर कूलर व प्युरिफायरचे उद्घाटनसोहोळा पार पडला..
- भरणा नाका येथील बालाजी हाॅटेल ते टीबीजे काॅलेजकडे जाणा-या रस्त्यावर वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळल्याने वहातुक ठप्प
- चिपळूणच्या नवदुर्गांचा शिवसेना युवासेनेतर्फे सन्मान
- चिपळूण तालुका दुष्काळी यादीत समावेशासाठी आमदार शेखर निकम यांचे तातडीने निवेदन; मंत्री मकरंद जाधव यांचे सकारात्मक निर्देश
- गोकुळ दूध संघावर सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीचा झेंडा; चिपळूणशी नाते असलेल्या दोन उमेदवारांचा विजय..!