मुंबई दि. 09 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले आणि बहुचर्चित अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार कंगना राणावत यांची कोलकाता ते मुंबई विमान प्रवासात भेट झाली.
ना. रामदास आठवले यांच्या शेजारच्या सीटवर कंगना राणावत होत्या. त्यामुळे या विमान प्रवासात दोघांमध्ये चर्चा रंगली. कंगना राणावत यांचा सन 2020 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शिवसेनेशी वाद झाला होता. त्यावेळी रिपब्लिकन पक्षाने कंगना राणावतची बाजु घेवुन पाठिंबा दिला होता. त्याची आठवण कंगना राणावत यांनी ना. रामदास आठवले यांना सांगुन त्यांचे आभार मानले. कंगना राणावत यांचे बांद्रा पाली हील येथील ऑफिसचा काही मुंबई महापालिकेने नियमबाहय ठरवुन तोडला होता. ती चुकीची कार्यवाही होती. त्या ऑफिसच्या तोडफोडीमुळे कंगना राणावत यांचे मोठे नुकसान झाले. ती नुकसान भरपाई मिळवुन देण्यासाठी आपण प्रयत्न करु असे आश्वासन ना. रामदास आठवले यांनी अभिनेत्री कंगना राणावत यांना यावेळी झालेल्या चर्चेत दिले. कंगना राणावत यांचे अनेक चित्रपट लोकप्रिय झालेले आहेत. सद्या त्या नविन चित्रपटाची निर्मीती करीत आहेत. अभिनया सोबत त्या चित्रपट निर्मीती क्षेत्रातही त्यांनी प्रवेश केला आहे अशी माहिती अभिनेत्री कंगना राणावत यांनी ना. रामदास आठवले यांना दिली.
