चिपळूण : भाजपचा स्थापना दिवस आणि माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तसेच लोकप्रिय खासदार नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव आणि नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या हस्ते वडनाका येथील नागरी आरोग्य केंद्राला वॉटर प्युरीफायर आणि संगणक संच भेट देण्यात आला.

आरोग्य सभापती शुभम पिसे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी नगरपालिकेतील गटनेते शशिकांत मोदी, महिला बालकल्याण सभापती रसिका देवळेकर, बांधकाम सभापती निहार कोवळे, आरोग्य सभापती शुभम पिसे, नगरसेविका वैशाली निमकर, नगरसेविका अंजली कदम, माजी नगरसेवक तसेच भाजपचे जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, कोषाध्यक्ष आशिष खातू, जिल्हा सदस्य स्वाती देवळेकर, भाजपच्या शहर मंडल सरचिटणीस सारिका भावे, उपाध्यक्ष जतिन घटे, मधुकर निमकर, प्रीतम इंगवले, विलास चव्हाण, अभिषेक जागुष्टे , अभिषेक साळुंखे, ज्येष्ठ कार्यकर्ते महेश दीक्षित, कुणाल आंबेकर, महेंद्र भालेकर, पूनम काजारे, प्राजक्ता टाकळे, महेश कांबळी, सर्वेश सुर्वे, अमोल तटकरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ ज्योती यादव यांच्यासह भाजपचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.