चिपळूण ( ललेश कदम ) : शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात चतुरंग प्रतिष्ठान तर्फे 25 व 26 एप्रिल 2026 रोजी दोन दिवसीय कोकण अभ्यासवर्ग विद्याथ संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या भव्य शैक्षणिक सोहोळ्यात तब्बल 14 नामवंत मान्यवरांची प्रत्यक्ष उपस्थिती लाभणार असल्याची माहिती चतुरंगचे संस्थापक कार्यकर्ते विद्याधर निमकर यांनी युनायटेड इंग्लिश स्कूल येथील आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी नितीन दिक्षीत व इंद्रायनी दिक्षीत आदी उपस्थित होते. कोकण अभ्यासवर्ग या विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या तीन महत्त्वपूर्ण उपक्रमांच्या टप्प्यांचा हा विशेष योग आहे. निवासी अभ्यासवर्गाची तिशी, सर्वोत्तम विद्याथ गोडबोले पुरस्काराची पंचवीशी आणि निर्धार निवासीवर्ग योजनेची विशी असे तीनही टप्पे पूर्ण होत असल्याने गेल्या 30 वर्षांतील विद्यार्थ्यांचे एकत्रित विद्याथ संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलनात आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, यूजीसीचे माजी उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, एआय तज्ज्ञ डॉ. भूषण केळकर, नेत्र शल्यविशारद डॉ. तात्याराव लहाने, आयपीएस अधिकारी अतुलचंद्र कुलकण, उद्योजक विठ्ठल कामत, जागतिक अर्थतज्ज्ञ दीपक करंजीकर, समाजसेवक डॉ. प्रसाद देवधर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. सागर देशपांडे, आदित्य शिंदे, जगदीश इंदलकर, सुचेता भवाळकर तसेच निवृत्त न्यायमूत मृदुला भाटकर हे मान्यवर विविध नऊ सत्रांमध्ये व्याख्याते, मार्गदर्शक, संवादक आदी भूमिकांमधून मार्गदर्शन करणार आहेत.
अधिक माहितीसाठी चतुरंग कार्यालय, बुरूमतळी, मध्यवत एसटी स्टँड समोर, सारस्वत बँकेच्या वर, चिपळूण येथे संपर्क साधावा किंवा इंद्रायणी दीक्षित 9890983716, यश कापडी 9422564018 व आनंद जोशी 9423805005 यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.