खेड : भारतीय जनता पार्टी आणि राजवैभव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने खेड शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘नमो दांडिया’ २०२६ या नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात बॉम्बे हूपर शिवानी धोपावकर यांच्या दमदार आणि आकर्षक सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या खास शैलीतील परफॉर्मन्सने कार्यक्रमात रंगत आणली, तर नागरिकांसोबत दांडिया खेळत त्यांनी उत्सवाचा आनंद द्विगुणित केला. यामुळे संपूर्ण कार्यक्रमस्थळी उत्साह, जल्लोष आणि नवरात्रोत्सवाचा रंग अधिकच खुलला.
भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर आणि भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांच्या पुढाकाराने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला खेड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. महिला, तरुणाई आणि नागरिकांनी दांडियाच्या तालावर ठेका धरत नवरात्रोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. शिवानी धोपावकर यांच्या दमदार सादरीकरणाने कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या या सोहळ्याला विशेष रंगत प्राप्त झाली. आपल्या अनोख्या शैलीत सादरीकरण करत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला आणि नागरिकांसोबत दांडिया खेळण्यातही सहभाग घेतला. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे उपस्थितांचा उत्साह अधिकच वाढला. टाळ्यांचा कडकडाट, दांडियाचा ताल आणि नागरिकांचा जल्लोष यामुळे कार्यक्रमस्थळ उत्सवी वातावरणाने भारावून गेले. भारतीय जनता पार्टी आणि राजवैभव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नमो दांडिया’ २०२६ या उपक्रमातून खेड शहरातील नागरिकांना नवरात्रोत्सव एकत्रितपणे आणि उत्साहात साजरा करण्याची संधी मिळाली. ॲड. वैभव खेडेकर यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाने शहरातील नवरात्रोत्सवाच्या उत्साहात विशेष भर घातली.
शिवानी धोपावकर यांच्या दमदार परफॉर्मन्सची रंगत आणि दांडियाच्या तालावर थिरकणाऱ्या नागरिकांचा उत्साह यामुळे ‘नमो दांडिया’ २०२६ खेडकरांसाठी आकर्षणाचा ठरला.
खेडमध्ये ‘नमो दांडिया’चा जल्लोष; बॉम्बे हूपर शिवानी धोपावकर यांच्या दमदार परफॉर्मन्सने जिंकली मने..!
