खेड : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व माजी बांधकाम मंत्री श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांचे विशेष कार्य अधिकारी (एस.डी.ओ.) श्री संतोष साखरे साहेब यांचा जनता दरबार मंगळवार, दिनांक २८/०४/२०२६ रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याचे शासकीय विश्रामगृह, डाक बंगला येथे सकाळी दहा ते चार या वेळेत आयोजित करण्यात आलेला आहे.
खेड तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांनी आपल्या भागातील मंत्रालय, महसूल, आरोग्य, एसटी, महावितरण, बांधकाम खाते, जिल्हा परिषद बांधकाम, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग, कृषी खाते, विकासकामे, भूमी अभिलेख, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस, नगर प्रशासन आणि इतर विभागांतील समस्या असल्यास आपली निवेदने घेऊन यावे व शासकीय दिरंगाईची कामे मार्गी लावावीत. आपण सर्वांनी आपली निवेदने घेऊन या जनता दरबारामध्ये सहभागी व्हावे, ही विनंती.
