खेड (प्रतिनिधी) : – क्रीडा क्षेत्रात गेली दोन दशके सातत्याने उल्लेखनीय कार्य करत विविध स्तरावरील स्पर्धांचे यशस्वी आयोजन, खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच सामाजिक व प्रशासकीय जबाबदाऱ्यांमधून क्रीडाविकासाला चालना देणारे खेडचे उपनगराध्यक्ष श्री. सतीश उर्फ पप्पू गणपत चिकणे यांना प्रतिष्ठेचा “राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा भूषण पुरस्कार २०२६” जाहीर झाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त दिशा महाराष्ट्राची या संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा राज्यस्तरीय सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असून, त्यामध्ये क्रीडा क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल श्री. चिकणे यांची निवड करण्यात आली आहे. हा सन्मान सोहळा दि. २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० या वेळेत खेड, रत्नागिरी येथे पार पडणार आहे.