रत्नागिरी : जिल्ह्यातील खेड परिसरात रविवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. सुरुवातीला सोसाट्याचा वारा सुटल्याने परिसरात वादळी परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
रविवारी मध्यरात्री सुरू झालेला पाऊस सोमवारी पहाटेपर्यंत सुरूच होता. अचानक आलेल्या या वादळी पावसामुळे खेड परिसरात पावसाळी वातावरण निर्माण झाले. मध्यरात्रीच्या सुमारास वारा आणि त्यानंतर कोसळलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.