चिपळूण : दिशा फाऊंडेशन पुरस्कृत राष्ट्रवादी युवक काँग्रेस,खेर्डी आयोजित खेर्डीतील प्रतिष्ठित व्यक्तीमत्व मा.श्री.अनिलशेठ दाभोळकर यांच्या 70 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज सोमवार दि.30 मार्च 2026 ते बुधवार दि.01 एप्रिल 2026 दरम्यान खेर्डी बाजारपेठ येथे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री “कै.अजित दादा पवार क्रिडानगरी” मध्ये भव्य दिव्य अशा स्वरुपातील तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
दिशा फाऊंडेशन पुरस्कृत राष्ट्रवादी युवक काँग्रेस,खेर्डी तर्फे गेली सलग 3 वर्ष या स्पर्धेचे उत्तम व नियोजनबद्ध आयोजन होत असुन यावर्षी या स्पर्धेचे हे चौथे पर्व आहे.सदर कबड्डी स्पर्धा ही तिन दिवसीय असुन स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आज सोमवार दि.30 मार्च 2026 रोजी रात्री ठिक 9 वाजता चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय श्री.शेखरजी निकम सर, श्री.जयंद्रथ शेठ खताते,श्री.अनिल शेठ दाभोळकर,सौ.दिशाताई दाभोळकर,श्री.नितीन(अबुशेठ) ठसाळे,श्री.दशरथ शेठ दाभोळकर,श्री.प्रकाश शेठ साळवी यांच्यासह खेर्डीतील प्रमुख राजकीय व सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा उदघाटन सोहळा पार पडणार आहे तर स्पर्धेच्या अंतिम दिवशी बुधवार दि.1 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी अंतिम सामना होणार असून याच दिवशी प्रमुख पाहुणे व क्रिडा रसिक यांच्या उपस्थितीत श्री.अनिल शेठ दाभोळकर यांचा 70 वा वाढदिवस केक कापुन साजरा केला जाणार आहे.
या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत चिपळूण तालुक्यातील 16 नामवंत संघ सहभागी होणार आहेत.तरी या कबड्डी स्पर्धेचा थरार अनुभवण्यास व पाहण्यासाठी खेर्डीतील तसेच चिपळूण तालुक्यातील सर्व कबड्डी रसिकांनी उपस्थित राहुन संपुर्ण स्पर्धेचा आस्वाद घ्यावा असे आवाहन दिशा फाऊंडेशन व राष्ट्रवादी युवक काँग्रेस,खेर्डी तर्फे करण्यात येत आहे.
खेर्डीत आज रंगणार भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार
