खोपोली – खोपोली शीलफाट्यावर एका खाजगी बसचा ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील आठ ते नऊ वाहनांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत, तर 12 जण किरकोळ जखमी झाले आहेत
माऊली ट्रॅव्हलची बस ही सुरत वरून प्रवाशी घेऊन पंढरपूर कडे जातं असताना, ती खोपोली जवळील शिळफाट्यावर आली असता बसचा ब्रेक फेल झाल्याने बसने समोरील आठ ते ते नऊ वाहनांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात एक रिक्षा दोन कार दोन पीकअप, आणि तीन ते चार दुचाकिंचा समावेश आहे.
या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, हेल्प फाउंडेशनचे सदस्य, शीलफाट्यावरील स्थानिक ग्रामस्थ तात्काळ दाखल होत अपघातग्रस्त वाहनातून जखमीना बाहेर काढून त्यांना खोपोली नगरपालिका, डॉ जाखोटीया हॉस्पिटल, आणि एमजीएम रुग्णालयात तात्काळ पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत,तर अपघात ग्रस्त बस क्रेनच्या साहाय्याने बाजूला घेऊन रस्ता चालू करण्यात आला आहे या अपघातामुळे जुन्या मुंबई पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.