चिपळूण : दरवर्षीप्रमाणे यंदाही ज्येष्ठ सिनेकलावंत आणि आपल्या सर्वांचे लाडके नाना पाटेकर यांच्या निवासस्थानी आमदार शेखर निकम यांनी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले.

यावेळी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध समाजोपयोगी कामांबाबत, तसेच चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघात आणखी कोणत्या पद्धतीने नदीतील गाळ काढणे, नदी संवर्धन आणि जलसंधारणाची कामे प्रभावीपणे करता येतील, याबाबत सविस्तर चर्चा झाली.

समाजहित आणि पर्यावरण संवर्धनासाठी सुरू असलेल्या या कार्याला पुढे नेण्यासाठी सकारात्मक विचारविनिमय झाला.