मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. यावेळी विविध निवडणूकविषयक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
या शिष्टमंडळात विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री नसीम खान, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे उपनेते आमदार अमिन पटेल, आमदार भाई जगताप, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर, राजेश शर्मा, अभिजीत सपकाळ आणि निमिष साने उपस्थित होते.