चिपळूण: कोकण रेल्वेच्या १३२ जागांसाठी कोकण रेल्वेने दिनांक.१४ /५/२०२६ रोजी भरतीचे परिपत्रक जाहीर केले आहे. सदर च्या मुलाखती ०८/०६/२०२६ पासून आंध्रप्रदेश विशाखापट्टणम मध्ये ऑफलाईन घेण्यात येणार आहेत. भरती कोकण रेल्वे मार्फत व त्याचा मुलाखती महाराष्ट्राच्या बाहेर आंध्रप्रदेश विशाखापट्टणम येथे घेण्यात येणार असल्यामुळे कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी विरोध केला असून संताप वक्त केला आहे.
मुकादम पुढे म्हणाले की कोकण रेल्वेची भरती परराज्यांमध्ये घेऊन परप्रांतियांना कोकण रेल्वेमध्ये घुसविण्याचा हा डाव आहे
कोकण रेल्वे भरतीच्या मुलाखती महाराष्ट्राच्या बाहेर घेण्याचा संबंध येतो कुठे? असा सवाल श्री मुकादम यांनी केला आहे.
कोकण रेल्वेच्या होणाऱ्या भरतीच्या मुलाखती मुंबई, बेलापूर, मडगाव, रत्नागिरी याप्रकारे पूर्वीप्रमाणे याच सेंटरला घेण्यात याव्यात अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती तर्फे करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या बाहेर ऑफलाईन मुलाखती एक वर्षांकरिता घ्यायच्या व त्या बेरोजगारांना कोकण रेल्वे मध्ये कायम करायचे हा वरिष्ठांचा डाव आम्ही हाणून पाडू व परप्रांतीयांची भरती कोकण रेल्वे मध्ये होऊन देणार नाही असेही मुकादम यांनी जाहीर केले आहे..