लांजा: – लांजा येथील सीनियर काॅलेज व महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा न्यायमूर्ती माधव जे.जामदार, उच्च न्यायालय तथा पालक न्यायमूर्ती रत्नागिरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
या शिबिराचा उद्देश शासकीय योजनांची माहिती व सुविधा तलाठ्यापर्यंत पोचवणे हा आहे. सेवा योजना चे काम दाखवणारे जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद जाधव, वैधेही रानाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी बार असोसिएशनचे अँड विलास पाटणे रत्नागिरी, बार असोशियशनचे सदानंद गांगण लांजा, जिल्हा विधी संघटना सचीव आर.आर पाटील, यांनी या शिबिराचे आयोजन केले आहे.
न्यायमूर्ती जामदार म्हणाले, “रत्नागिरी जिल्ह्यात मी ज्या ठिकाणी गेलो नाही, त्याठिकाणी हे शिबिर घ्यावे. लांजा या ठिकाणी सलसलत्या उत्साहात हा कार्यक्रम केला आहे. त्याबद्दल संपूर्ण जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले पाहिजे.”
न्याय प्रतेक नागरिकांपर्यंत व शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोचायला पाहिजे, अशी न्यायाची संकल्पना आहे. भारतीय संविधानाने जे बहाल केले आहे, ते सर्व नागरिकांन पर्यंत पोहचले पाहिजे.
या शिबिरात सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, जेष्ठ नागरिक, आरोग्य विभाग, शैक्षणिक, महसूल, महीला, बालविकास, समाजकल्याण, कृषी विभाग, दिव्यांगाना, विधवा अशा अनेक विषयांवर हे महाशिबीर हेघेण्यात आले आहे. या मध्ये पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले, विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले, काही संस्थांना चेक्स चे वाटप करण्यात आले.
