लांजा : शहरातील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते योगेश वाघधरे यांच्या हनुमान मंदीरात हनुमान जयंती निमित्त जन्म उत्सव साजरा करण्यात आला तो खालीलप्रमाणे.
पहाटे हनुमान जन्माचा कीर्तन ह.भ.प.जगन्नात गोसावी यांचा ,आरती, दिंडी मिरवणूक काढण्यात आली हनुमान मंदिर,पोष्ट गल्ली, विठ्ठलादेवी, पौळतेश्व मंदिर समोरून,चव्हाटा मंदिर, सोनारगल्ली, हायवेरस्ता ते परत हनूमानमंदिर असी दिंडी काढण्यात आली.
या दिंडीत लांजा तालुका वारकरी संप्रदायातील मनोहर रणदिवे, प्रकाश कुंभार, दर्शन आग्रे,कुळदिप आग्रे,राजारम करंबेले, संतोष शिंदे, गोविंद चव्हाण,देऊ इंदवटकर, संतोष कुर्णेकर, नामदेव गुरव,श्रवणी यादव, चंद्रकांत पवार,उमेश बेर्डे, संजय पांचाळ, चैतन्य पांचाळ, प्रभाकर जाधव, प्रतिभा जाधव,पल्लवी गुंडये, विष्णु लांजेकर,विजय वाडेकर, किशोर लांजेकर, प्रकाश रामाणे, तुळशीराम मोरे,श्री परापते,निवोशी,गोळवशी,आंजणारी, येथील वारकरी सहभागी झाले होते.व बाजार पेठेतील भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
लांजा,लांज्यात हनुमान जयंती निमित्त दींडी मिरवणूक काढण्यात आली.
