लोटे : खेड तालुक्यातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुण्याच्या एम. ई.एस. कॉलेज ऑफ नर्सिंग घाणेखुंट लोटे येथे संशोधन क्षेत्रातील गुणवत्ता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने “सिस्टॅमॅटिक रिव्ह्यू, मेटा-ॲनालिसिस आणि बिब्लिओमॅट्रिक ॲनालिसिस” या विषयावरील परिषदेचे उद्घाटन आज दि. १५ रोजी झाले व पहिला दिवस उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. परिषदेमध्ये संशोधन पद्धती, पुराव्यावर आधारित अभ्यास तसेच आधुनिक संशोधन विश्लेषण तंत्रांविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या परिषदेच्या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून नर्सिंग फॅकल्टी, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक च्या अधिष्ठात्या डॉ.श्रीलेखा राजेश उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. सागर नेवसे होते.
लोटे येथे सिस्टेमॅटिक रिव्ह्यू, मेटा-एनालिसिस आणि बिब्लिओमेट्रिक एनालिसिस या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन संपन्न
