मंडणगड : मराठी पत्रकार परिषद, मुंबई संलग्न रत्नागिरी शाखा मंडणगडच्या अध्यक्षपदी सचिन माळी, तर सचिव व जिल्हा कार्यकारिणी प्रतिनिधीपदी ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन केले.
पत्रकारिता ही लोकशाहीचा महत्त्वपूर्ण आधारस्तंभ असून, समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासोबतच सामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकारांकडून केले जाते. मंडणगड तालुक्यातील पत्रकारितेला अधिक सक्षम दिशा देत सामाजिक प्रश्न, विकासकामे आणि जनहिताच्या विषयांना प्रभावीपणे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी नवनिर्वाचित पदाधिकारी निश्चितच योगदान देतील, असा विश्वास अभिजीत देवळेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
मराठी पत्रकार परिषद मंडणगड शाखेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन…
