खेड : सहयाद्रि शिक्षण संस्था, सावर्डे, संचलित तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल मोहाने या विद्यालयाच्या वतीने मोहाने येथील स्मशानभूमीजवळ असलेल्या ओढयावर जलसंधारण अभियाना अंतर्गत बुधवार दिनांक २१ ऑक्टोबर रोजी वनराई बंधारा बांधण्यात आला.
यावेळी विदयालयाचे शालेय समितीचे सदस्य विष्णू केशव मोरे, शशिकांत गणपत मोरे, तसेच मोहाने विदयालयाचे मुख्याध्यापक धनंजय नायकल, सहा. शिक्षक समिर भोसले, शत्रुघ्न मोरे, दगडु म्हाब्दी व विदयालयातील सर्व विदयार्थी, मोहाने केंद्राचे केंद्रप्रमुख विनायक नलावडे , मोहाने व ऐनवली गावातील ग्रामस्थ राजेंद्र विष्णू शेलार, सचिन मोरे, एकनाथ मोरे, सचिन बनगरे तसेच अंगणवाडी सेविका सौ.उषा चिकणे आदी उपस्थित होते. यावेळी जि.प. प्राथमिक शाळा मोहानेचे सर्व शिक्षक व विदयार्थी, तसेच जि.प. शाळा ऐनवली नंबर १ चे सर्व शिक्षक व विदयार्थी, उपस्थित होते. बंधा-याच्या भरणीसाठी आंबवली पंचक्रोशीतील समाजसेवक शिक्षणप्रेमी विजयशेठ गोगावले यांनी स्वतःचा जे.सी.बी आणून माती भरणेसाठी मोलाचे सहकार्य केले. या सर्वांच्या सहकार्यातुन वनराई बंधारा उत्तमरित्या बांधून पूर्ण झाला. या बंधा-यामुळे पाण्याचा मोठा साठा होणार असल्याने मोहाने व ऐनवली गावातील ग्रामस्थांना पाणीटंचाईवर मात करणेसाठी मदत होणार आहे.
उपस्थित सर्व विदयार्थी, शिक्षक व ग्रामस्थ यांचे विष्णू मोरे यांनी सहकार्याबद्दल आभार मानले व विशेष आभार विजय गोगावले यांचे मानले.
मोहाने विदयालय, जि.प.शाळा मोहाने ऐनवली, व ग्रामस्थ यांच्या वतीने बांधला वनराई बंधारा…!
