खेड : येथील समर्थनगर येथील सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक मिलिंद रामचंद्र रानडे यांची गृहराज्य मंत्री ना. योगेशदादा रामदासभाई कदम यांच्या माध्यमातून शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री. रानडे पोलीस मित्र म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा मिळत आहेत.
खेडचे सेवानिवृत्त शिक्षक मिलिंद रानडे विशेष कार्यकारी अधिकारी…!
