मुंबई : मुंबई मंत्रालय येथे राज्याचे सहकार मंत्री मा. बाळासाहेब पाटील यांची, चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम सर यांच्या मार्गदर्शनानुसार- रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी चिपळूण व रत्नागिरी जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील विविध प्रश्नांवर सकारात्मक आणि सविस्तर चर्चा करण्यात आली.
या भेटीप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिपळूण शहराध्यक्ष मिलिंद कापडी, चिपळूण अर्बन बँक संचालक समीर जानवलकर, सचिन चोरगे, रत्नागिरी जिल्हा बँक संचालक अजित यशवंतराव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेत प्रामुख्याने खालील विषयांवर चर्चा झाली :
- चिपळूण अर्बन बँकेच्या विकासासाठी व बँकेच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक सहकार्य
- शेतकरी, छोटे व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिकांना सहकारातून अधिक सक्षम करणे
- रत्नागिरी जिल्ह्यातील सहकारी संस्था, पतसंस्था व बँकिंग क्षेत्राला बळकटी देणे
- चिपळूण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार विभागाकडून आवश्यक मदत
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सर्व विषय अत्यंत आपुलकीने समजून घेतले व याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या सकारात्मक भूमिकेबद्दल पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले.
ही भेट अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडली असून, चिपळूण व रत्नागिरी जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रासाठी ही भेट निश्चितच फलदायी ठरेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.
