पेण (प्रशांत पोतदार) : पेण येथील भोगावती नदीपात्राजवळ खेळताना पिंपळ डोह परिसरात गेलेला हॉलीबॉल काढण्याच्या प्रयत्नात २० वर्षीय वसीम अन्सारी याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
शुक्रवारी नदीपात्रात शोधमोहीम राबवून या तरुणाचा मृतदेह रेस्क्यू टीमने बाहेर काढण्यात यश मिळवले.
या घटनेची नोंद पेण पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यावेळी पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांनी पालकांना मुलांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले.