लांजा:(गोविंद चव्हाण) : हेरीटेज कल्चर आर्ट अँड डेव्हलपमेंट सोसायटी, लांजा संचलित, न्यू इंग्लिश स्कूल जावडे या माध्यमिक विद्यालयात, शालेय मंत्रिमंडळ निवडणूक २०२६ ची लोकशाही पद्धतीने पार पडली असून या निवडणुकीत विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कुमार प्रणव कोलगे व विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून कुमारी प्राची आगरे यांची बहुमताने निवड करण्यात आली.
​ विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीची मूल्ये रुजवण्यासाठी, निवडणूक प्रक्रियेची ओळख करून देण्यासाठी आणि त्यांच्यात नेतृत्वगुणांचा विकास करण्यासाठी “हेरीटेज प्रयोगभूमीत “‘ न्यू इंग्लिश स्कूल, जावडे येथे नुकतीच शालेय मंत्रिमंडळ निवडणूक अत्यंत उत्साहात आणि पूर्णपणे लोकशाही मार्गाने पार पडली. या निवडणुकीद्वारे शाळेचा मुख्य प्रतिनिधी म्हणून कु. प्रणव लक्ष्मण कोलगे व उपमुख्य प्रतिनिधी म्हणून कु. प्राची प्रमोद आगरे आणि विविध खात्यांचे मंत्री (सांस्कृतिक, क्रीडा, अर्थ, वाचनालय,आरोग्य व स्वच्छता मंत्री) यांची निवड करण्यात आली.

​शालेय निवडणूक अगदी खऱ्याखुऱ्या राजकीय निवडणुकीप्रमाणे अत्यंत शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यात आली. निवडणुकीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर इच्छुक विद्यार्थ्यांनी आपापल्या पदांसाठी उमेदवारी अर्ज भरले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणारे सहायक शिक्षक कुणाल कदम यांनी अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली.
​उमेदवारांना आपल्या प्रचारासाठी ३ दिवसांचा वेळ देण्यात आला होता. उमेदवारांनी आकर्षक भित्तीपत्रके (Posters), घोषणा आणि वर्गात जाऊन प्रचार केला.
मतदानाचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा होता. वर्गावर्गांत मतदान केंद्रे तयार करण्यात आली होती. गुप्त मतदान पद्धतीने (Secret Ballot) प्रत्येक विद्यार्थ्याने आपले मत नोंदीवले.मतदानादरम्यान पूर्ण पारदर्शकता राखण्यात आली आणि विद्यार्थीनी मतदान केंद्राध्यक्ष व इतर अधिकारी म्हणून चोख भूमिका बजावली.
​मतमोजणी आणि निकाल मतदान संपल्यानंतर निवडणूक समितीच्या देखरेखीखाली आणि शिक्षकांच्या उपस्थितीत मतमोजणी अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आली.
​दुपारच्या सत्रात शाळेच्या मैदानावर सर्व विद्यार्थ्यांसमोर निवडणूक निकाल जाहीर करण्यात आले. विजयी उमेदवारांची नावे घोषित होताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले.
या निवडणुकीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना लोकशाहीची ताकद आणि प्रक्रियेचा अनुभव देणे हा होता. सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तीत आणि समजूतदारपणे मतदानाचा हक्क बजावला, ही कौतुकास्पद बाब आहे.
सर्व नवनिर्वाचित मुख्य प्रतिनिधीने यांचे संस्थेचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कांबळे, संचालक आर्यवर्धन कांबळे तसेच सर्व शिक्षक व पालक वर्ग यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.