चिपळूण : बुद्ध विहार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह भूमिपूजन सोहळा, वैशाख बुद्ध पौर्णिमा १ मे २०२६ रोजी, चिपळूण-संगमेश्वर विधानसभेचे आमदार शेखर निकम सर यांच्या शुभहस्ते, चिपळूण नगर परिषद नगराध्यक्ष उमेश सकपाळ, सामाजिक कार्यकर्ते राजुभाई जाधव, पंचायत समिती सदस्य सुभाष जाधव यांच्या उपस्थितीत, कोंडे बौद्ध वाडी येथे उत्साहात संपन्न झाला.
या वेळी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उल्हासजी कदम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कदम गुरुजी, विकास कदम, माजी सरपंच मिलिंद कदम, तसेच शाखेतील पुरुष व महिला मंडळ यांनी विशेष मेहनत घेतली.