चिपळूण : रिगल सोसायटी संचलित रिगल कॉलेज जेईई / नीट या महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठी जेईई / नीटच्या अभ्यास वर्गाला सुरुवात झाली आहे. चिपळूणमध्ये रिगलने प्रथमच कोटा पॅटर्न आणला आहे. याच अनुषंगाने सीबीएसई बोर्डचे ११ वी सायन्स कॉलेज देखिल सुरु करण्यात आले आहे.
गेली १५ वर्ष व्यवसायाभिमुख देण्याच्या रिगल महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात एक नवीन धाडसी पाऊल टाकले आहे. जेईई/नीटच्या अभ्यास वर्गाला सुरुवात झाली असून त्यासाठी कोटा येथील तज्ज्ञ व १० वर्षाहून अधिककाळ अनुभव असलेले प्राध्यापक वर्ग चिपळूण येथे कायमस्वरूपी राहून दिवसाचे चोवीस तास, आठवड्याचे सातही दिवस ते विद्याथ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कोकणात प्रथमच २ वर्षाचा फुल्ली इंटिग्रेटेड प्रोग्रम राबविण्यात येत असल्याने त्याचा अधिकचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.
इयत्ता ११ वी च्या पहिल्या दिवसापासून जेईई/नीटचा अभ्यासक्रम शिकविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जेईई/नीटच्या अभ्यासवर्गाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून त्याला चांगला प्रतिसाद देखिल लाभत आहे. प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी रिगल कॉलेज कोंढे, गुहागर रोड, चिपळूण ७७६८९८८५८४, या ८३२९१०४८७८६ क्रमांकावर संपर्क साधावा किंवाwww.regalcollege.in संकेत स्थळाला भेट द्यावी, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे .