राजापूर : तालुक्याच्या पूर्व भागातील पाचल आणि पंचक्रोशीतील शेकडो ग्रामस्थांनी एसटी महामंडळाच्या अनियमित सेवेविरोधात आज (मंगळवारी) सकाळी ११ वाजता पाचल बसस्थानकावर तीव्र आंदोलन छेडले. पाचल व्यापारी संघटना, सर्वपक्षीय पदाधिकारी, सरपंच-उपसरपंच, रिक्षा चालक-मालक तसेच प्रवासी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले.
एसटीच्या अनियमित वेळापत्रकामुळे परिसरातील प्रवासी, व्यापारी आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. आजिवली-कल्याण, येरडवं-मुंबई या गाड्या नियमित सोडण्यात याव्यात, तसेच मलकापूर मार्गे पुणे एसटी सुरू करावी आणि संध्याकाळच्या वस्तीच्या गाड्याही पूर्ववत चालू कराव्यात, अशी प्रमुख मागणी ग्रामस्थांनी केली.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
