रोहा ( अल्ताफ चोरडेकर ) : समाजातील दीन दुबळ्यांना आधार देत सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या रायगड जिल्हा फलाये तंजीम या संस्थेची त्रेवार्षिक निवडणुकीत संस्थेच्या अध्यक्षपदी अलिबाग शहरातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते हाजी इम्तियाज अब्दुल सत्तार पालकर तर खोपीली शहरातील प्रसिद्ध विधीतज्ञ ऍड.इब्राहिम अब्दुल रशीद भुसारी यांची जनरल सेक्रेटरीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सलग ३० वर्ष अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे मुस्तफा पोंजेकर यांच्या अध्यक्षतेखाली नागोठणे येथील कार्यालयात फलाये तंजीम या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी दुपारी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.सचिव ऍड. इब्राहिम भुसारी यांनी मागील इतिवृत्त वाचून तो कायम करण्यात आला. त्याचप्रमाणे विद्यमान कार्यकारी मंडळाची मुदत संपल्याने पुढील तीन वर्षासाठी नवीन कार्यकारणी मंडळ गठीत करण्याचा सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला.निवडणूक निर्णय अधिकारी जाफर येरुणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या निवडणूक कार्यक्रमात अध्यक्षपदासाठी तीन जणांची नावे पुढे आल्याने अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते हाजी इम्तियाज पालकर यांच्या नावाला एकमताने संमती दर्शविण्यात आली.या माध्यमातून इम्तियाज पालकर यांची संस्थेच्या अध्यक्षपदी तर ऍड. इब्राहिम भुसारी यांची जनरल सेक्रेटरीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी मावळते अध्यक्ष मुस्तफा पोंजेकर, उपाध्यक्ष अतिक खोत,मोहम्मद आली पल्लवकर,डॉ.जमालूद्दीन कुरुककर,डॉ.मुश्ताक मुकादम, नविद सोंडे,जाफर येरुणकर, इम्तियाज दर्जी,अकबर खाजे, हसन झमाने,बशीर परबलकर, मकसूद नजिरी,मौलाना मसरुल अलम,निसार मोरबेकर,अकील लांबते,नविद चोगले आदी जण उपस्थित होते..
रायगड जिल्हा फलाये तंजीम कमिटी अध्यक्षपदी हाजी इम्तियाज पालकर यांची बिनविरोध निवड
