माखजन (गौरव पोंक्षे ) :श्री सत्यसाई जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने श्री सत्यसाई सेवा समिती रत्नागिरी विविध सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम सादर करीत आहे त्याचा एक भाग म्हणून जागतिक महिला दिनानिमित्ताने रत्नागिरीतील चार मान्यवर महिलांचा कौतुक सोहळा आज श्री गजानन महाराज मंदिर आणि श्री सत्यसाई सेवा समिती रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात पार पडला.त्यासाठी चारही मान्यवर महिलांना शाल ,श्रीफळ ,मोमेंटो तसेच स्वामींच्या पादुका देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाला श्री गजानन महाराज मंदिर, पॉवर हाऊसचे अध्यक्ष श्री म. वा .देसाई तसेच श्री सत्यसाई सेवा समिती, रत्नागिरीचे कनव्हेनर श्री. भूषण अनंत बेलवलकर उपस्थित होते.सौ. स्वाती भूषण बेलवलकर यांनी रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे यांमान्यवर समूहाच्या संचालिका सौ.दयाताई भिडे यांचा श्रीमती .नलिनी बोंद्रे यांनी तसेच सौ मुग्धाताई भट सामंत यांचा सत्कार सौ .प्रज्ञाताई गोखले यांनी केला.कार्यक्रमाला श्री.गजानन महाराजांचे भक्त व श्री . सत्यसाई सेवा समितीचे साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रत्नागिरी येथे कर्तृत्वान महिलांचा सन्मान
