जळगाव:- शरद पवारांना बाप म्हणून, सुप्रियाताईंना मोठी बहीण म्हणून राजकीय पोळी भाजली. आमदारकीचा तुकडा काय टाकला की पक्ष सोडून गेले अशांनी तर ताईंवर बोलूच नये असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी भाजप आमदार चित्रा वाघ यांना डिवचले आहे.
खडसे म्हणाल्या की, आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी खुलं आवाहन काय स्वीकारलं तर लोकांच्या पायाखालची जमीनच सरकलेली दिसतीये ! चर्चेला येण्याची हिम्मत नाही, आपण एक्सपोज होऊ म्हणून ‘चित्रा’विचित्र माणासांना छू… म्हटल.
बरं या ‘चित्रा’विचित्र माणसांची जागा काय ? तर आधी यांनी आदरणीय शरद पवार साहेबांना बाप म्हणून, आदरणीय सुप्रियाताईंना मोठी बहीण म्हणून पदे मिळवली, स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतली आणि आमदारकीचा तुकडा काय टाकला की पक्ष सोडून गेले. तिकडे गेल्यावर देखील पवार साहेब, सुप्रियाताई यांच्यावर टीका केल्यावरच यांचे घर चालते !
अशा लोकांनी तरी सुप्रियाताई सुळेंवर बोलू नये
