रायगड : भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जन शिक्षण संस्थान रायगड व नांदी व (लोरियल) L’Oréal फाउंडेशन सी.एस.आर प्रोजेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील ब्युटी पार्लर या कौशल्य विकास उपक्रमात सहभागी साधन व्यक्ती, विद्यार्थी व कर्मचारी यांच्याकरिता नांदी व (लोरियल) L’Oréal फाउंडेशन सी.एस.आर प्रोजेक्ट द्वारा रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून 320 विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात आले.

त्यातील 264 यशस्वी लाभार्थ्यांना”ब्युटी फॉर बेटर लाइफ” या 13 दिवसीय कौशल्यवृध्दी व क्षमता बांधणी कार्यशाळेचे मोफत टूलकिट व प्रमाणपत्र वाटप जन शिक्षण संस्थान रायगडच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. मेधा सोमैय्या, अध्यक्ष डॉ नितीन गांधी, उपाध्यक्ष रत्नप्रभा बेल्हेकर,संचालक डॉ विजय कोकणे बी.एम.व्ही ट्रस्टच्या अध्यक्ष रत्ना जोशी व राजवर्धन जोशी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ प्रकाश यादव प्राध्यापिका डॉ पूजा भालेराव व प्रतिनिधी सौरभ आंबीलपुरे नंदी फाउंडेशनच्या समन्वयक प्रज्ञा अग्रवाल,आरती पांडे,जन शिक्षण संस्थान रायगडचे बोर्ड मेंबर नरेन जाधव चार्टर्ड अकाउंटंट संजय राऊत आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.