भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा आ. चित्राताई वाघ यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव हाणून पाडण्याचाच सातत्याने प्रयत्न करणारे राहुल गांधी महिला सक्षमीकरणावर गप्पा मारतात, हे निव्वळ हास्यास्पद असल्याची टीका चित्रा वाघ यांनी केली.

राहुल गांधींना थोडीही लाज असेल, तर त्यांनी तत्काळ महिला आरक्षणाला पाठिंबा जाहीर करावा आणि महिला सक्षमीकरणाला हातभार लावावा, असेही त्या म्हणाल्या.

क्षमता असूनही प्रियंका गांधी यांच्या जागी राहुल गांधी यांनाच संधी का देण्यात आली? प्रियंका गांधी यांना वयाच्या २५व्या वर्षी लग्न करून सासरी का पाठवून देण्यात आले? तसेच, पुरुषसत्ताक रचनेचे सर्वाधिक लाभार्थी राहुल गांधी यांनाच का बनविण्यात आले? या प्रश्नांची उत्तरे सोनिया गांधी यांनी देशाला दिली पाहिजेत, असा सवालही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यनगरीत राहुल गांधी यांनी आज महिलांचा केवळ अपमानच केला असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आम्ही या प्रकाराचा तीव्र धिक्कार करतो, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.