गुहागर : अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ गुहागर तालुका यांच्या वतीने आज गुहागर शहरातील भंडारी भवन येथे श्रावण भजन महोत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले आहे.
आपली भजन परंपरा टिकून रहावी. कलाकाराला आपली कला जोपासता यावी. भजन माध्यमातून समाजप्रबोधन होवून हिंदवी भागवत सनातन धर्माची परंपरा टिकून राहावी. ईश्वर रुपी सेवेचा मिळालेला वारसा जपता यावा. वृध्दापकाळात कलाकारांना दुस-यावर अवलंबून न राहता त्यांना आपण केलेल्या कलेच्या सेवेचा शासनाकडून मिळणारा मोबदला मिळावा तसेच सर्व भजनी कलाकार एक व्हावे. संघटीत रहावे. यासाठी या भजनी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची सुरुवात सकाळी आठ वाजता भंडारी भवन सभागृहाच्या समोरील पटांगणामध्ये रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला आहे त्यानंतर दहा वाजता या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा. त्यानंतर गुहागर तालुक्यातील भजन मंडळाचे भजन सादरीकरण केले जाणार आहे. दुपार नंतर संतोष शिर्सेकर बुवा, श्रीधर मुणगेकर बुवा, रामदास कासले बुवा, भगवान लोकरे बुवा, प्रमोद हर्याण बुवा व इतर मान्यवरांचा गायन कार्यक्रम सादर केले जाणार आहे. त्यानंतर त्रिमुर्तीचा अमृत महोत्सव वाढदिवस सोहळा, आणि भैरवीने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
या कार्यक्रमासाठी आमदार भास्कर जाधव, माजी आमदार डॉ. विनय नातू, कृषी सभापती महेश नाटेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव, जिल्हा परिषद सदस्य नेत्राताई ठाकूर, प्रमोद गांधी, अपूर्वा बारगोडे, गुहागर पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, गुहागर नगराध्यक्ष निता मालप, उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल, तहसिलदार परिक्षीत पाटील, गटविकास अधिकारी प्रदीप शिंदे, गुहागर नगरपंचायत मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण, पोलीस निरीक्षक सचिन सावंत, श्री दुर्गादेवी देवस्थान अध्यक्ष किरण खरे, श्री व्याडेश्वर देवस्थान अध्यक्ष शार्दुल भावे, अखिल भजन सां. हि. मंडळ महा. राज्य अध्यक्ष भगवान लोकरे बुवा, सचिव प्रमोद हर्याण बुवा, अखिल भजन सां. हि. मंडळ रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष संतोष शिर्सेकर बुवा, सर्व गुहागर पंचायत समिती सदस्य आणि गुहागर नगरपंचायतचे नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.