जळगाव:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

खडसे म्हणाल्या की,

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेबांनी आज तिसऱ्यांदा राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली. ही फक्त एक शपथ नसून राजकारणात काम करणाऱ्या आमच्या सारख्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी आश्वासक, प्रेरणा आणि ऊर्जा देणारे चित्र आहे.

आदरणीय साहेब यांनी ६० वर्षांपेक्षा अधिक काळ संसदीय कारकिर्द गाजवली आहे. त्यात आणखी सहा वर्षे जोडले जातील. सलग इतकी वर्षे राजकारणात काम करणारे, मला वाटतं जगात एकमेव पवार साहेब असतील!

आदरणीय साहेबांची ही राज्यसभेची कारकीर्दही यशस्वीपणे पूर्ण होवो ही सदिच्छा!