चिपळूण (वार्ताहर): माता शारदा फाउंडेशन सावर्डे यांच्या वतीने संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त ग्रंथ प्रकाशन सोहळा रविवार दिनांक २९ महत्वाची दुपारी ३ ते ६.३० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी परमपूज्य अदृश्य श्री काडसिद्धेश्वर महाराज यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते ग्रंथ प्रकाशित होणार आहे. रविवार दुपारी ३ ते ३.३० वाजता विविध संतांच्या पालख्यांचे आगमन व स्वागत, दुपारी ३.३० ते ५.१५ वाजता संत रोहिदास महाराजांच्या निवडक पदांचे गायन कार्यक्रम होईल. यामध्ये संगीत प्रमोद देशपांडे मुंबई, गायक राजाभाऊ शेंबेकर, वरद केळकर आणि कु. अनन्या खेराडे हे गायन करणार आहेत. यामध्ये सहकलाकार अमित ओक, प्रथमेश देवधर, गौरव पाटकर, आदित्य खरे, सुश्रुत चितळे, चैतन्य जोगळे आणि निरुपण धनंजय चितळे करणार आहेत.
त्यानंतर सायंकाळी ५.१५ ते ६ वाजता ग्रंथ प्रकाशन व परम पूज्य अदृश्य श्री काड सिद्धेश्वर महाराज यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सायंकाळी ६ वाजता पसायदान गाऊन कार्यक्रमाची सांगता होईल. हा कार्यक्रम माता शारदा फाउंडेशन सावर्डे यांच्या मार्फत होत आहे.
कार्यक्रमात सहयोगी संस्था म्हणून लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय चिपळूण, रोहिदास समाजसेवा संघ चिपळूण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय चिपळूण, संस्कारभारती चिपळूण, शारदा संगीत, साहित्य, कला, क्रीडा अकादमी सावर्डे आणि ज्ञाती बांधव संस्था व वारकरी सांप्रदाय सामील होणार आहेत. सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष चंद्रकांत सावर्डेकर यांनी केले आहे.