चिपळूण : सावर्डे येथील मुंबईगोवा महामार्गावर दुचाकी अपघातात दोघेजण जखमी झाल्याची घटना 10 मार्च रोजी सकाळी 8.45 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेय जगन्नाथ बोल्ये वय 22, सध्या रा. रामटेकडी डोंगर विभाग, शिवडी, मुंबई; मूळ रा. ताम्हाणे ता. राजापूर हा युनीकॉर्न दुचाकी क्र. एमएच -47-सी बी -0788) चालवत मुंबई गोवा महामार्गावरून मुंबईहून राजापूरकडे जात होता. सावर्डे येथील हिवेन हॅप्पी पंजाबी धाबा समोर आल्यानंतर त्याने दुचाकी बेदरकारपणे चालविल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या जाहिरातीच्या फलकाला धडक दिली.
या अपघातात चालक अमेय बोल्ये याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या मागे बसलेला यश सहदेव बोल्ये वय 24, रा. ताम्हाणे ता. राजापूर यालाही किरकोळ दुखापत झाली. जखमींना उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गगनेश चंद्रकांत पटेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमेय बोल्ये याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सावर्डे पोलिस करत आहेत.