खेड : – चैत्र शुद्ध पौर्णिमा गुरुवारी हनुमान जयंती निमित्त औदुंबर श्रीदत्त देवस्थान, सुकिवली, तालुका खेड येथे सायंकाळी हरिपाठ व भजनाचे कार्यक्रम झाले. यानिमित्त वर्षभर भजन आणि हरिपाठ यांसारखे नामस्मरणाच्या कार्यक्रमासाठी सदैव उपस्थित राहणाऱ्या भाविकांना आणि भक्तांना देवस्थानचे संस्थापक हभप श्रीकांत चाळके तसेच हभप विष्णू जाधव महाराज, सिताराम शिंदे महाराज आणि बाळकृष्ण चाळके यांच्या उपस्थितीत आध्यात्मिक सेवा प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
औदुंबर श्रीदत्त देवस्थान येथे प्रत्येक गुरुवारी, एकादशी आणि पौर्णिमेनिमित्त हरिपाठ आणि भजनाचे कार्यक्रम होतात. या गुरुवारी देखील चैत्र शुद्ध पौर्णिमा आणि हनुमान जयंती निमित्त औदुंबर श्रीदत्त देवस्थान येथे सायंकाळी हे सर्व कार्यक्रम पार पडले. यावेळी दत्तभक्त हभप श्रीकांत चाळके, हभप विष्णू जाधव महाराज, हभप स्वाती चाळके, सीताराम शिंदे, बाळकृष्ण चाळके, राजेंद्र मोरे, रचना मोरे, हभप प्रमोद चव्हाण, श्रीकांत भिकू चाळके, शीतल चाळके, सुलोचना चाळके, अक्षय चाळके, मानसी चाळके, अक्षता आंबेकर, प्रकाश कदम ( कांदोशी), प्रमिला कदम, वर्षा चव्हाण इत्यादी भाविक भक्त उपस्थित होते. या सर्वाना अध्यात्मिक सेवा प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. या सर्व भाविकांच्या उपस्थितीमध्ये हरिपाठ व भजनाचे कार्यक्रम आध्यात्मिक वातावरणात पार पडले.
सुकीवलीतील औदुंबर श्रीदेवस्थान येथे भाविक भक्तांना आध्यात्मिक सेवा प्रमाणपपत्रांचे वितरण !
