मंडणगड : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कडून नंबर एक ही तालुक्यातील एक उपक्रमशील शाळा म्हणून नावारुपाला येत आहे. शाळेतील मुख्याध्यापक श् सुनिल आईनकर यांच्या कल्पनेतून विविध उपक्रम प्रशालेत राबविले जात आहेत. त्यातीलच पावसाळ्याच्या हंगामात परिसरात उपलब्ध होणाऱ्या विविध रानभाज्यांचे प्रदर्शन शाळेमध्ये भरविण्यात आले. त्यामध्ये मुलांनी स्वतः त्याची मांडणी करून विविध प्रकारच्या एकूण 18 प्रकारच्या भाज्यांचे प्रदर्शन करून त्याची माहिती उपस्थित ग्रामस्थ आणि महिला यांना सांगितली.. संपूर्ण कार्यक्रम श्री कोळेकर सर यांच्या उत्तम नियोजनातून संपन्न झाला.. प्रदर्शन पाहण्यासाठी ग्राम पंचायत अधिकारी श्री दिनेश जाधव अंगणवाडी ताई काजोल खैरे, रोहित भेकत शाळा व्यवस्थापन समिती सौरभ खैरे, प्रविण जंगम, सचिन खैरे, गजानन पवार , सुलोचना जगताप, सिद्धी पवार, असे अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी शाळेने राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.
फोटो ओळी
प्रशालेत आयोजीत रानभाज्या प्रदर्शनात सहभागी विद्यार्थी व शिक्षक
कुडुक खुर्द नंबर एक शाळेत भरला रानभाज्यांचा मेळा..
