मंडगणड : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व दोशी-वकील महाविद्यालय, गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवत्ता हमी कक्ष अंतर्गत रसायनशास्त्र विभागाच्या वतीने ‘प्रयोगशाळा व्यवस्थापन व सुरक्षा’ या विषयावर ऑनलाईन कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस मार्गदर्शक म्हणून महाड येथील ई. एच. एस. प्लॉस्टीक कंपनीचे व्यवस्थापक श्री. संजय महामुने उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दोशी-वकील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जनार्धन होटकर होते. सदर ऑनलाईन कार्यशाळेस लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मीक परहर, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. मुकेश कदम, प्रा. संदीप निर्वाण, प्रा. शरिफ काझी, डॉ. विभूते, डॉ. नागोरे , डॉ. ठाकूर, प्रयोगशाला सहायक श्री. रंजीत म्हाप्रळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यशाळेच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे स्वागत डॉ. कांचन माने यांनी केले. तत्पूर्वी प्राचार्य डॉ. जनार्धन होटकर यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना कार्यशाळा आयोजित करण्यामागील उद्देश स्पष्ट केला व प्रमुख पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून दिली.
मार्गदर्शक म्हणून बोलताना श्री. संजय महामुने यांनी सांगितले की, सुरक्षित कामकाजाचे वातावरण राखण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये विविध सुरक्षा पद्धती आवश्यक असून योग्य सुरक्षा कार्यपद्धती एक जबाबदार प्रयोगशाळा संरक्षण संस्कृतीला प्रोत्साहन देते. सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून संशोधक आणि विद्यार्थी आत्मविश्वास आणि कार्यक्षमतेने प्रयोग करू शकतात. प्रयोगशाळेची सुरक्षा अनेक कारणांसाठी महत्त्वाची आहे. प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ते व्यक्तींचे रासायनिक बर्न, विषारी वायु, आगीचे धोके आणि शारीरिक जखमांपासून संरक्षण करते. दुसरे म्हणजे प्रदूषण आणि प्रक्रियात्मक त्रुटी कमी करून प्रयोगांची अखंडता सुनिश्चित करते.. लॅब सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. रासायनिक गळती आणि स्फोटांमुळे दुखापत होऊ शकते किंवा मृत्यू देखील होऊ शकतो. विषारी पदार्थांच्या संपर्कात आल्याने दीर्घकालीन आरोग्य समस्या उद्भवू शकतात. याव्यतिरिक्त, अयोग्य कचरा विल्हेवाट पर्यावरणास हानी पोहोचवू शकते शैक्षणिक संस्था आणि संशोधन सुविधांना सुरक्षेच्या उल्लंघनामुळे दंड होऊ शकतो.
यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी ऑनलाइन कार्यशाळेत सहभागी झाले होते. कार्यकामचे सूत्रसंचालन प्रा. अमोल घोटी यांनी तर शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. संदीप निर्वाण यांनी मानले.