मंडणगड : महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार योगेश कदम यांच्या विशेष शिफारशीतून व शिवसेना महिला आघाडीच्या तालुका संघटक अमिता शिंदे व अनंत शिंदे ग यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मौजे टाकेडे येथे ६० लाख रुपये खर्चाच्या साकव बांधकामाला मंजुरी मिळाली आहे. या कामाचा भूमिपूजन सोहळा नुकताच रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता केंद्रे यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला शिवसेना मंडणगड तालुकाप्रमुख तथा रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली . टाकेडे येथे साकव बांधण्यात येणार असल्याने स्थानिक ग्रामस्थांना दिलासा मिळणार असून, परिसरातील दळणवळण अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमास पंचायत समितीच्या सभापती प्रणाली चिले, उपसभापती दीपक मालुसरे, माजी सभापती अमिता शिंदे, पंतायत समिती सदस्य अनिल रटाटे, दीप्ती घडशी, शिवसेना विभागप्रमुख संजय शेडगे, ज्येष्ठ शिवसैनिक अनंत शिंदे शिवसेना सचिव सिद्धेश देशपांडे, युवासेना जिल्हा सचिव गणेश बिल्लार, टाकेडे शाखाप्रमुख अनिल गणवे यांच्यासह ग्रामस्थ व महिला मंडळाच्या सदस्यांची उपस्थिती होती.
या विकासकामासाठी प्रयत्न व पाठपुरावा करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांमुळे टाकेडे गावाच्या विकासाला चालना मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
टाकेडे येथे ६० लाखांच्या साकव कामाचे भूमिपूजन; मंत्री योगेश कदम यांच्या प्रयत्नांना यश…
