गुहागर : गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथील पीएमश्री स्कूल या प्रशालेस ध्येय एज्युकेशन फाउंडेशनचा अत्यंत मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार २०२६ नुकताच जाहीर झाला आहे राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री माननीय नामदार दादाजी भुसे यांच्या शुभहस्ते तर आमदार राहुल दादा कुल आमदार उमाताई खापरे आमदार अमित घोडके आमदार अरुण लाड तसेच पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे शिक्षण विभागातील अत्यंत वरिष्ठ सनदी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक २९मार्च२०२६ रोजी ग. दि. माडगूळकर नाट्यगृह निगडी पुणे येथे सदर पुरस्काराचे समारंभपूर्वक वितरण करण्यात येणार आहे.
पीएमश्री वेळणेश्वर प्रशाला गुहागर तालुक्यातील सर्वाधिक पटसंख्या व पीएमश्री या केंद्र सरकारच्या पथदर्शी प्रकल्पासाठी निवड झालेली एकमेव प्रशाला आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विविधांगी उपक्रम राबवणारी प्रश्नाला म्हणून जिल्हात सुप्रसिद्ध आहे
पीएमश्री स्कूल वेळणेश्वर मध्ये डिजिटल व इंटरॅक्टिव्ह वर्ग अध्यापनाद्वारे अत्याधुनिक शिक्षणासाठी सुसज्ज आयडियल सेंटर, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन सेंटर, योग, कला, क्रीडा, नृत्य, संगीत व संगणक या विषयासाठी स्वतंत्र तज्ञ प्रशिक्षक, मराठी शाळा वाचवण्यासाठी, दर्जेदार पुर्व प्राथमिक शिक्षणासाठी सुरू करण्यात आलेला अनोखा बालवाटिका उपक्रम, प्लास्टिक मुक्त शाळा उपक्रम, ऑक्सीजन पार्क सुविधा , पहिल्या महिला कराटे ब्लॅक बेल्ट धारक शिक्षिका सुलक्षणा करडे राशिनकर यांच्या मार्गर्शनाखालील विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांसाठी मोफत स्वसंरक्षणाचे धडे, शिवकालीन दुर्मिळ ऐतिहासिक मर्दानी खेळांची जपणूक, लक्षवेधी झांज पथक, लक्षवेधी समई नृत्य सादरीकरण, राष्ट्रीय आविष्कार अभियानाच्या अंतर्गत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रातील तज्ञांची मार्गदर्शने, खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रात्रीचे आकाश दर्शन कार्यक्रम, विविध अभ्यासपूर्ण क्षेत्रभेटी, प्रात्यक्षिक अनुभवात्मक भेटी, व्यसनाधीनतेबद्दल जनजागृती व्याख्याने, युथ व इको क्लबच्या माध्यमातून पर्यावरण विषयक जनजागृतीसाठी राबविलेले विविध उपक्रम, जवाहर नवोदय विद्यालय व अन्य स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची निवड, मिशन लोकशाही, इस्त्रो – नासा उपक्रमातील उल्लेखनीय सहभाग, हरित शाळा उपक्रमांतर्गत स्वच्छता पंधरवडा, मेडिकल किचन गार्डन, विशेष समता प्रकल्पांतर्गत किशोरवयीन मुलींसाठी विविधअंगी शास्त्रीय मार्गदर्शनाची उपलब्धता मोफत सॅनिटरी पॅड वाटप, ब्रिक्स रोबोटिक्स व अन्य व्यवसाय शिक्षण, भारत स्काऊट गाईड व कब बुलबुल मेळाव्यात जिल्ह्यातील प्रथम क्रमांक, जिल्हास्तरीय अजिंक्य पद ज्युदो कराटे स्पर्धेतील सुवर्णपदकांची कमाई, जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेतील प्रथम क्रमांकाची कामगिरी, विज्ञान प्रदर्शनातील सातत्यपूर्ण लक्षवेधी सहभाग नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत शालेय परिसरात उभारण्यात आलेला पीएमश्री सेल्फी पॉईंट ,इंटरनेट सुविधेच्या माध्यमातून परदेशातील तज्ञांचे शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन सुसंवाद, पुस्तक समृद्धी योजनेतून बालवाचनालय ,आपत्ती व्यवस्थापन व सायबर सुरक्षितता विषयक प्रभावी जनजागृती उपक्रम, माजी विद्यार्थी संघाचा व पालकांचा शाळा विकासातील सहभाग आदी विशेष लक्षवेधी उपक्रमांची या राज्यस्तरावरून दखल घेऊनच सदर पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याचे ध्येय एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुदाम शेंडगे यांनी कळविले आहे
या यशाबद्दल प्रशालेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक सतीश नलावडे पदवीधर शिक्षिका शैलजा साळे पदवीधर शिक्षक बिपीन विचारे उपशिक्षक बाबासाहेब राशिनकर उपशिक्षिका सुलक्षणा करडे- राशिनकर उपशिक्षिका भारती गोवेकर शिक्षणसेविका प्रियंका पवार शिक्षणसेविका अंजुम शेख शिक्षणसेविका तेजस्विनी जगताप यांचे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप गावणंग उपाध्यक्ष वैभव ठाकूर सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष विश्वजीत जामसुतकर विद्यार्थी,पालक व वेळणेश्वर ग्रामस्थ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे