लांजा : लांजा तालुक्यातील हुंबरवणे जाधववाडी येथे श्रीराम नवमी जन्मोत्सवानिमित्त आगरवाडी येथील ह.भ.प. दीपक महाराज रामाणे यांच्या भन्नाट कीर्तनाने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. रामनवमी निमित्ताने रामाणे यांनी ‘रामचरित्रात पंढरीचा महिमा’ या विषयावर कीर्तन सादर केले.
हुंबरवणे जाधववाडी येथील ह.भ.प. रामचंद्र जाधव व ह.भ.प. राजाराम जाधव यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे रामनवमीचा कार्यक्रम आयोजित केला जातो. सदर कार्यक्रम पालू येथील ह.भ.प. रामदास नामे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडतो. या कार्यक्रमाला लांजा आगरवाडी येथील ह.भ.प. दर्शन आग्रे यांच्या मंडळाने साथ देत शोभा वाढवली. तसेच ह.भ.प. तुळशीराम मोरे (भांबेड) यांनीही उत्तम प्रकारे सहकार्य केले.
सदर कार्यक्रम दोन दिवसांचा असून शेवटच्या दिवशी तुळशीराम मोरे यांच्या कार्यक्रमाने सांगता करण्यात आली.
