चिपळूण : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी खासदार तथा शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यादरम्यान चिपळूण येथे झालेल्या भेटीगाठींनी संघटनात्मक बळकटी आणि स्थानिक प्रश्नांवरील भूमिका अधिक स्पष्ट केली.
चिपळूण येथील शासकीय विश्रामगृहात मुक्कामी असताना त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत संघटनात्मक बांधणीवर विशेष भर देत, चिपळूणच्या नागरिकांच्या प्रश्नांसाठी ठामपणे लढा उभारण्याचे निर्देश त्यांनी दिले. कार्यकर्त्यांनी केवळ राजकीय उपस्थिती न ठेवता, जनतेच्या अडचणींमध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
या प्रसंगी स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या नगरसेवक अजय भालेकर व वैशाली कदम यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच युवा सेनेचे शहराधिकारी पार्थ जागुष्टे यांना त्यांच्या विवाहानिमित्त शुभेच्छा देत, संघटनेतील नव्या पिढीला प्रोत्साहन देण्याचा संदेश देण्यात आला. याचबरोबर योगेश पप्या राऊत यांचा वाढदिवस साजरा करत, कार्यकर्त्यांमधील आपुलकी आणि स्नेहबंध अधोरेखित करण्यात आले.
या भेटीदरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच, या दौऱ्याने चिपळूणमधील संघटनात्मक हालचालींना नवी ऊर्जा मिळाल्याचे चित्र दिसून आले.
