लांजा:- (गोविंद चव्हाण) दिनांक 15 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट या दरम्यान बजरंग दला च्या माध्यमातून बूढ़ा बाबा अमरनाथ यात्रा आयोजित करण्यात आली होती. पूछ जिल्ह्य़ातील बुढ्ढा अमरनाथ,तसेच रियासी जिल्ह्यातील शिव खोडी या मंदिरांमध्ये दर्शन आणि वैष्णो देवी दर्शन असे या यात्रेचे स्वरूप होते..
लांजा तालुक्यातील 46 बंधु भगिनी या यात्रेत सहभागी झाले..
यावेळी यात्रेमध्ये सहभागी झालेल्या जेष्ठ नागरिक श्रीमती सुरेखा दळी , श्रीमती सुवर्णा भाय शेटे आणि 9 वर्षाची कुमारी कुंजल रमेश बाणे या तिघींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात माननीय नगराध्यक्ष सौ सावली कुरूप प्रमुख निमंत्रित तर
विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री दिपक जोशी, सहमंत्री श्री अशोक पाखरे, प्रखंड अध्यक्ष श्री दादा रणदिवे, प्रखंड मंत्री श्री अशोक शिंदे, बजरंग दल विभाग संयोजक श्री प्रसाद ठाकूर, जिल्हा संयोजक विराज चव्हाण ,तालुका संयोजक श्री राजू मोरे ,सेवा प्रकल्प प्रमुख श्रीमती प्रियवंदा जेधे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते..
श्रावण मासातिल शिव क्षेत्रातील दर्शनाचे महत्व तर अनन्यसाधारण आहेच शिवाय जम्मू मधील या यात्रेचा हेतु, तिथल्या मोजक्या हिंदू बांधवाना भेट देणे आणि अन्य हिंदू बांधव या कठिण परिस्थिती मध्ये सुद्धा आपल्यासह आहेत हा संदेश देणे असा आहे.
काही यात्रेकरूंनी प्रातिनिधिक अनुभव कथन केले.. कडक सुरक्षा व्यवस्था, सैनिकांचे सीमेवरचे जीवन, तिथला निसर्ग, प्रतिकूल परिस्थिती असूनही बजरंग दल कार्यकर्त्यांनी केलेल्या निवास, प्रवास, वाहन, लंगर, खानपान आणि स्वच्छता व्यवस्था याच उल्लेख त्यांच्या बोलण्यात सतत येत होता..
रुग्ण उपयोगी साहित्य प्रकल्प याबाबत श्रीमती प्रिय वंदा जेधे यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात, श्री अशोक पाखरे यांनी विश्व हिंदू परिषदेच्या स्थापने बाबत माहिती दिली. आणि सर्वानी भेद विसरून एकत्र येण्याची, दृढ संकल्प करण्याची आवश्यकता विशद केली..
151 वर्षे पूर्ण केलेल्या वन्दे मातरम या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली..