दापोली : दापोली नगरपंचायत येथे ९ ऑगस्ट क्रांतीदिनाच औचित्य साधून दापोली नगरपंचायत येथील प्रांगणात असलेल्या क्रांती स्तंभांला अभिवादन करण्याचा कार्यक्रम सकाळी ठीक ९.१५ वाजता साजरा करण्यात आला. यावेळी सर्वानी क्रांती स्तंभाला अभिवादन करुन देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणा-या क्रांतिकारकांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
या प्रसंगी दापोली नगरपंचायतीच्या प्रथम नागरिक माननीय नगराध्यक्षा सौ. कृपाताई घाग मॅडम, मा आरोग्य सभापती सौ जयाताई साळवी मॅडम, प्रशासकीय अधिकारी श्री सारंग कुलकर्णी तसेच सदर कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणारे जि.परिषद सदस्य श्री किशोर भाई देसाई, स्वातंत्र्य सैनिक श्री श्रीकृष्णजी पेठे काका,स्वातंत्र्य सेनानी श्री भगतसिंगजी फाटक यांचे सुपुत्र डॉ. शिरीषजी फाटक,स्वातंत्र्य सेनानी शिवराम मुरकर यांचे सुपुत्र श्री विजयजी मुरकर, सैन्य दलातुन निवृत्त झालेले श्री राजेन्द्रजी शिगवण तसेच दापोली शहरातील नागरिक व दापोली नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून मा.नगराध्यक्षा सौ. कृपाताई घाग यांनी प्लास्टिक पिशवी मुक्त दापोली या अनुषंगाने उपस्थितांना कापडी पिशव्यांचे वाटप केले.
दापोली नगरपंचायतीकडून क्रांतीकारकांना अभिवादन…
