लांजा : संसदेच्या आवारात पवित्र साधू वेशाचा गैरवापर करून कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांच्या विरोधात सातारा जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या कृत्याचा निषेध करण्यासाठी ‘अखिल भारत हिंदू महासभा’ व ‘समस्त हिंदुत्ववादी संघटना, यांनी प्रत्येक जिल्ह्यात निवेदन दिली जातील पप्पू यादव यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे असे अखिल भारत हिंदू महासभा व हिंदू संघटना यांनी जोर धरला आहे.
यावेळी हिंदू महासभेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनराज जगताप यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे खासदार पप्पू यादव यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीआहे.असेनिवेदनात म्हटले आहे.
.नुकत्याच झालेल्या संसदेच्या अधिवेशनादरम्यान खासदार पप्पू यादव यांनी पवित्र भगवा वेश आणि साधूचा पोशाख परिधान करून एक निंदनीय कृत्य केले. राजकीय स्वार्थासाठी त्यांनी संपूर्ण साधू समाजाला ‘चोर’ आणि ‘लुटारू’ म्हणून हिणवले. इतकेच नव्हे तर, हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांचा फोटो जमिनीवर ठेवून त्यांचा घोर अवमान केला. भगवा रंग हा त्याग आणि सनातनी संस्कृतीचे दैदिप्यमान प्रतीक असताना, लोकशाहीच्या पवित्र मंदिरात लोकप्रतिनिधीकडून अशी स्टंटबाजी होणे अत्यंत लज्जास्पद आहे.
