मुंबई- देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय समारंभासाठी राज्य सरकारकडून जिल्हा निहाय ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी आज जाहीर करण्यात आली. या यादीनुसार नाशिक जिल्हा मुख्यालयी भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री गिरीश महाजन, तर रायगड जिल्हा मुख्यालयी शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्याहस्ते ध्वजारोहण केले जाणार आहे. या दोन्ही जिल्ह्यांना अद्यापही पालकमंत्री लाभलेले नाही.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी नाशिकमध्ये भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे, तर रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. अद्याप या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम आहे. त्यामुळे नाशिकमध्ये आणि रायगडमध्ये १५ ऑगस्टला ध्वजारोहणाचा मान नेमका कोणाला मिळणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. अखेर ही माहिती समोर आली आहे. नाशिकमध्ये गिरीश महाजन हे १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करणार आहेत. तर रायगडमध्ये भरत गोगावले हे ध्वजारोहण करणार आहेत.
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अजूनही कायम आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावर शिवसेना शिंदे गटाकडून तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देखील दावा करण्यात आला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मंत्री आदिती तटकरे या पालकमंत्रिपदासाठी उत्सुक आहेत. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून मंत्री भरत गोगावले हे देखील रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी उत्सुक आहेत, त्यामुळे अजूनही रायगडला नवा पालकमंत्री मिळू शकलेला नाहीये. अजूनही रायगडला पालकमंत्र्यांची प्रतिक्षा आहे. त्यामुळे यावेळी १५ ऑगस्टला ध्वजारोहण कोण करणार? आदिती तटकरे की भरत गोगावले याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर यावेळी ध्वजारोहणाचा मान हा भरत गोगावले यांना मिळाला आहे.
