खोपोली : खोपोली शहरातून होणाऱ्या पाताळगंगा नदीच्या पात्रात आज एक युवक वाहताना दिसल्यानंतर, सदरची बाब हेल्प फाउंडेशनच्या सदस्यांना समजल्यानंतर सर्व सदस्यांनी नदीच्या शेजारी वेगवेगळ्या ठिकाणी धाव घेऊन सदर युवकाला शोधण्याचा प्रयत्न केल्याचे आज रोजी पहावयास मिळाले.

वासरंग येथील युवक नदीच्या पात्रात पडल्याचे वृत्त समजतात सर्व हेल्प फाउंडेशनच्या सदस्यांनी, वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे बांधणी केली यात यश आले असून आय ओ सी पुलाला नदीच्या पात्रात एक युवक गटांगड्या खाताना अमोल कदम यांना दिसून आला त्यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेत सदर युवकाला सुखरूप नदीच्या पात्रातून बाहेर काढले. या घटनेने सर्वत्र हेल्प फाउंडेशनच्या सदस्यांचे कौतुक करण्यात येत आहे. या युवकाचे नाव सचिन असल्याची माहिती मिळत आहे
अखेर देवाच्या रूपाने एल फाउंडेशन चे कार्यकर्ते धावून आले. देव तारी त्याला कोण मारी त्याचा प्रत्यय आज खोपोलीकरांनी याची डोळा पाहिला