अमरावती : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांचे पैसे अनेक महिन्यांपासून अडकून पडल्याने संतप्त झालेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी 22 मे 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून प्रशासनाला जाब विचारला.

पैसे येणे बंद झाल्याचे कारण अद्यापही कळले नसून अनेक महिन्यांचे पैसे अडकले आहेत, अशी तक्रार महिलांनी उपजिल्हाधिकारी यांना सांगितले. लाडकी बहीण योजनेचे पैसे येणे अचानक बंद झाले आहे. त्याचबरोबर e-KYC रद्द झाल्याने पुन्हा करण्याचे सांगितले जात असून अडकलेल्या सर्व महिलांचे कारण जाणून घेऊन योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी यावेळी लाडक्या बहिणींनी केली.

या सह काही महिलांना ‘Multiple Family’ मध्ये टाकून न कळत अपात्र केले आहे. याचे कारणही जाहीर झाले नाही. पात्र असूनही योजनेतून वगळल्याने अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडले आहे. सणासुदीच्या तोंडावर पैसे न आल्याने महिलांमध्ये प्रचंड नाराजी आहे.