चिपळूण : मा. नगराध्यक्ष श्री.उमेशदादा सकपाळ यांच्या वाढदिवसा निमित्ताने आयोजित राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा नुकत्याच रामतीर्थ जलतरण तलाव चिपळूण येथे संपन्न झाल्या या स्पर्धेत सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमी, चिपळूण च्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत आपल्या जलतरण कौशल्याचा ठसा उमटवला.
या स्पर्धेत 6 वर्षे वयोगटात अकॅडमीच्या खेळाडूंनी 4 पदके मिळवली. मुलींच्या 25 व 50 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात साईशा प्रसाद परब हिने 2 रौप्य पदक तसेच स्वराली मानस संसारे हिने 2 कांस्य पदक पटकाविले.8 वर्षाखालील वयोगटात मुलींमध्ये 50 मी.फ्रीस्टाईल व बॅकस्ट्रोक प्रकारात ओवी पंकज कोरडे हिने 2 कांस्य पदक व 50 मी. ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात आयशा खिजर फकीर – कास्य पदक, 45 ते 55 वयोगटात महिलांमध्ये 25 मी. फ्रीस्टाईल प्रकारात डॉ. मनीषा वाघमारे – कांस्य पदक प्राप्त केले.
या स्पर्धेत स्पंदना करंदीकर, रिवा हरगुरे, अद्विक कदम, निर्वेद जाधव,अमिना फकीर, आयुष घाडगे,संकल्प मोरे, सिद्धांश चव्हाण, विवान रहाटे, स्वराज जाधव, आभा जोशी, अरुण बिष्णोई या खेळाडूंनी देखील उत्साहाने सहभाग नोंदवला.
या सर्व यशस्वी खेळाडूंना राष्ट्रीय जलतरणपटू आणि NIS प्रशिक्षक स्नेहा सदाशिव रहाटे,व विनोद केशव राऊत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंच्या या उल्लेखनीय यशाबद्दल रामतीर्थ जलतरण तलाव, चिपळूण चे व्यवस्थापक श्री. प्रितम जाधव यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमी मधील लहान वयातील खेळाडूंची ही कामगिरी निश्चितच प्रेरणादायी आहे.
सह्याद्री स्पोर्ट्स अकॅडमीच्या रौप्य आणि कांस्य पदक विजेत्या जलतरणपटूंसोबत डॉ मनीषा वाघमारे…
