गावतळे : श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज गावतळे येथे ईडी अँड एफ मॅन कमोडिटीज इंडिया प्रा. लि. सिद्धार्थ सामाजिक संस्था सातारा त्याचप्रमाणे ध्यास परिवाराच्या संयुक्त विद्यमाने सुमारे 85000 किमतीच्या वह्या वाटप करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. दुर्गम भागातून येणाऱ्या या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची नितांत गरज ओळखून या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. ध्यास परिवाराचे सुदर्शन कानडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की जर तुम्हाला येणाऱ्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही.

विवेक इंदुलकरांनी सांगितले की संकटावर मात करायला शिकले पाहिजे ज्या लोकानी आपली एक समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांनाही त्यांच्या आयुष्यात संकट आली होती पण त्यावर त्यांनी विजय मिळवून आपले समाजातील स्थान भक्कम केले. प्राचार्या भक्ती सावंत यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला व आर्थिक परिस्थिती मुळे विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्यांची माहिती दिली तसेच ध्यास परिवाराचे शाळेला नेहमीच बहुमोल असे सहकार्य असते हे सांगितले. मुलांनी ही अशा ध्येय वेढ्या युवकाकडून प्रेरणा घेतली पाहिजे .याप्रसंगी ईडी अँड एफ मॅन कमोडिटीज इंडिया प्रा.लि. चे संदीप कदम अभय पाटील ध्यास परिवाराचे विनय इंदुलकर, सुदर्शन कानडे , विवेक इंदुलकर सिद्धार्थ सामाजिक विकास संस्था सातारा चे संजय कांबळे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार यांनी बी. जे. कुचुनुरे यांनी मानले. याप्रसंगी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते